भारतीय चर्चापद्धती (भाग १)
स्वरूप वादविवादातील सहभागी घटक, वादाचे पद्धतिशास्त्र आणि खंडन-मंडनाचीप्रक्रिया यांचा निर्देश भारतीय परंपरेत मूलतः आहे. तिचे यथार्थ स्वरूपसमजावून घेणे ही विद्यमान लोकशाही स्वरूपाच्या भारतासारख्या बहुधार्मिक, संस्कृतिबहुल देशाची बौद्धिक गरज आहे. येथील विविध तऱ्हांच्या समस्यासार्वजनिकरित्या सोडविण्याच्या हेतूने अनेक विचारसरणीच्या अराजकीय, राजकीयआणि सामाजिक गटांमध्ये सुसंवाद होण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरणारी आहे.या पद्धतीचे अभ्यासपूर्ण विवेचन करणाऱ्या लेखाचा हा पहिला …